दर पाच मिनिटांनी होतो एकाचा अपघाती मृत्यू
By Admin | Published: August 11, 2014 12:01 AM2014-08-11T00:01:17+5:302014-08-11T00:01:17+5:30
मृत्यूचा घनता दर: अपघात रोखण्यासाठी शासन करणार प्रयत्न
बुलडाणा : रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात बळी पडणार्यांची संख्या मोठी असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मृत्यू घनता दराची आकडेवारी निश्चित केली आहे. त्यानुसार दर पाच मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरुकता नाही. रस्त्यांवर सूचना फलकांचा अभाव, बेशिस्त वाहतूक, पादचार्यांचे रस्त्यांकडे होणारे दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरते.
रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात चवथा क्रमांक लागतो. सर्वात जास्त अपघात होणार्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक या सहा शहरांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूच्या घनता दराची आकडेवारी तयार करून त्या आधारे महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.
** गोल्डन अवरमध्ये सुविधा
जीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल रूम आणि टोल फ्री १0८ सेवा पुरविल्या जाईल. सर्वच खासगी तसेच सरकारी रुग्णालय, रुग्णवाहिका, शववाहिका, रक्तपेढी, पोलिस स्टेशन या सर्वांनाच अपघाताची माहिती तातडीने उपलब्ध होईल. ह्यगोल्डन अवरह्ण अर्थात तातडीच्या प्रसंगी मिळालेल्या या सुविधांनी जखमींना उपचार मिळू शकतील.
** सवरेत्तम आरोग्य सेवा मिळणार
अपघात रोखण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात; शिवाय जिल्हा प्रशासन, परिवहन विभाग, पोलिस, बांधकाम विभाग, रस्ते प्राधिकरण, आरोग्य विभाग या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, यासाठी मृत्यूचा घनता दर निश्चित करण्यात आला आहे.
** मृत्यूदर वाढण्याची भीती
लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे. म्हणजे १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात. मृत्यूच्या घनता दरानुसार पाच मिनिटाला यापैकी एकाचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो. सध्याच्या मृत्यूच्या घनता दरानुसार हे प्रमाण बघता, २0२0 पर्यंत तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तविली आहे.