निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाणा-या पोलिसाचा अपघाती मृत्यू
By Admin | Published: June 14, 2015 01:37 PM2015-06-14T13:37:18+5:302015-06-14T13:42:38+5:30
राज्यातील महामार्गांवरील अपघातांची मालिका सुरुच असून रविवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून ८ प्रवासी जखमी झाले आहे.
>ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. १४ - राज्यातील महामार्गांवरील अपघातांची मालिका सुरुच असून रविवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून ८ प्रवासी जखमी झाले आहे. यातील एका अपघातात वसई विरार महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस कर्मचा-याचा बस अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरु असून या मतदानाच्या बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी नरेश पवार हे वसईच्या दिशेने निघाले होते. विक्रमगड - मनोर रस्त्यावर एसटी बस व टेम्पोमध्ये धडक झाली. या धडकेत एसटीतून प्रवास करणा-या नरेश पवार यांचा मृत्यू झाला. तर पाच प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. तर पुणे - बंगळुरु महामार्गावरही रविवारी सकाळी अपघात झाला. संकेश्वरजवळ अॅल्टो कारला टेम्पोने धडक दिल्याने कारमधून प्रवास करणा-या तिघा जणांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी जखमी झाले. मृत्यू झालेले सर्व जण हे कर्नाटकचे रहिवासी असून रुग्ण नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.