मेडिकल सीईटी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार

By admin | Published: March 10, 2015 04:32 AM2015-03-10T04:32:51+5:302015-03-10T04:32:51+5:30

यंदाची मेडिकल सीईटी ही ७ मे रोजी होणार असून, ही परीक्षा राज्य बोर्डाच्या बारावी विज्ञान अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी

According to the medical board of the CET State Board | मेडिकल सीईटी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार

मेडिकल सीईटी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार

Next

मुंबई : यंदाची मेडिकल सीईटी ही ७ मे रोजी होणार असून, ही परीक्षा राज्य बोर्डाच्या बारावी विज्ञान अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला़ या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, पीआयओ आणि ओसीआयचेही विद्यार्थी सीईटीला पात्र होणार आहेत.
सन २०१२ पूर्वी एमएच-सीईटी या सामायिक परीक्षा राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येत होत्या़ परंतु एमएच-सीईटी २०१४ करिता सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात आला. लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता़ त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून एमएच-सीईटीचा अभ्यासक्रम राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार घ्यावा, अशी विनंती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे केली होती. शासनाने आगामी शैक्षणिक वर्षापासून एमएच-सीईटी ही राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: According to the medical board of the CET State Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.