कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 08:40 PM2024-09-28T20:40:40+5:302024-09-28T20:42:36+5:30

कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ पट इतकी घसघाशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला होता.

According to Dhananjay Munde, the agricultural awards will be distributed tomorrow by the Governor | कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती

कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

कोविड तसेच विविध कारणामुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (1), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (8), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (8), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (8), वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (8), उद्यान पंडित पुरस्कार (8), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (40), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार (10), युवा शेतकरी पुरस्कार (8), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ पट इतकी घसघाशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली होती. या कार्यक्रमास शेतकरी- नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

Web Title: According to Dhananjay Munde, the agricultural awards will be distributed tomorrow by the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.