राज्यातील चोरीच्या ६५ हजार गुन्ह्यांतील आरोपी मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:30 AM2018-03-31T05:30:36+5:302018-03-31T05:30:36+5:30
राज्यात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या
राजेश निस्ताने
मुंबई : राज्यात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या ६५ हजार ६१५ गुन्ह्यांमधील आरोपी नेमके कोण, हे शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. गंभीर गुन्ह्यांमधील ‘डिटेक्शन’चे हे घटलेले प्रमाण पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडल्याचे अधोरेखित करीत आहे.
२०१७ मध्ये राज्यात चोरीचे ८६ हजार ७५० गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी केवळ २४.७६ टक्के म्हणजे २१ हजार १३५ गुन्हे उघडकीस आले. उर्वरित ६५ हजार गुन्ह्यातील चोरटे आजही डीबी स्कॉड, क्राईम ब्रँच, विशेष पथकांना हुलकावण्या देत आहेत. परंतु २५ टक्केही गुन्हे उघडकीस
येत नसल्याने पोलिसांचे खबरे
आहेत की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.
घरात शिरुन सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी वर्षभरात घरफोडीचे १५,४१० गुन्हे नोंदविले गेले. परंतु त्यापैकी केवळ ३१.३० टक्के (४८२२) गुन्हे उघडकीस आले.
महासंचालकांनी स्वत: केली खातरजमा
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांनी ‘डमी फिर्यादी’ पाठवून पोलीस ठाणेस्तरावर तक्रार दडपली जात असल्याबाबत स्वत: खातरजमाही करून घेतली.
कित्येकदा घरफोडी असेल तर ती चोरी दाखविण्याचा, दरोडा असेल तर पाच पेक्षा कमी आरोपी दाखवून त्याला चोरीचे स्वरूप देण्याचा, जबरी चोरी असेल तर केवळ चोरी दाखवून गुन्ह्याची तीव्रता दडपण्याचा प्रयत्न होतो.
‘कामगिरी’ दाखविण्यासाठी पोलीस अनेकदा आंतरराज्यीय टोळी पकडल्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात त्या गुन्ह्याचा तपास जिल्हास्तरीयही होत नाही.
वर्ष टक्के
खून ९३.९८
खुनाचा प्रयत्न ९८.३२
दरोडा ९७.७१
वर्ष टक्के
दरोड्यासह खून ९०.००
पिस्तुलसह दरोडा ७८.९५
जबरी चोरी ६८.८४
वर्ष टक्के
बलात्कार ९७.५२
दुखापत ९६.५१
दंगे ९७.६१