डेव्हिड हेडलीला बनवले आरोपी
By Admin | Published: November 19, 2015 05:04 AM2015-11-19T05:04:50+5:302015-11-19T05:04:50+5:30
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी (२६/११) विविध ठिकाणांची रेकी करणारा अमेरिकेतील लष्कर-ए-तैबाचा अतिरेकी व पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीला
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी (२६/११) विविध ठिकाणांची रेकी करणारा अमेरिकेतील लष्कर-ए-तैबाचा अतिरेकी व पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीला या खटल्यात आरोपी करण्याची परवानगी बुधवारी विशेष न्यायालयाने दिली. येत्या १० डिसेंबर रोजी त्याला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्याचे समन्स जारी केले.
२६/११च्या हल्ल्यात हात असल्याने अमेरिकेच्या न्यायालयाने हेडलीला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी बुधवारी अमेरिकेच्या संबंधित प्रशासनाला समन्स बजावत त्याला न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यास सांगितले आहे. हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला अतिरेकी सय्यद झबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्यावर सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्या. सानप यांनी वरील निर्णय दिला.