डॉक्टरकडे खंडणी मागणारा आरोपी फरारच, तक्रारदार डॉक्टरला पोलीस संरक्षण नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:15 AM2017-12-11T04:15:06+5:302017-12-11T04:15:21+5:30

खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडून मोठमोठ्या कारवाया केल्या जात असल्या, तरी कल्याण येथील एका डॉक्टरकडे सात लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपी जवळपास महिनाभरापासून मोकाट आहेत.

 The accused pleaded for a ransom, the complainant refused to give police protection | डॉक्टरकडे खंडणी मागणारा आरोपी फरारच, तक्रारदार डॉक्टरला पोलीस संरक्षण नाकारले

डॉक्टरकडे खंडणी मागणारा आरोपी फरारच, तक्रारदार डॉक्टरला पोलीस संरक्षण नाकारले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडून मोठमोठ्या कारवाया केल्या जात असल्या, तरी कल्याण येथील एका डॉक्टरकडे सात लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपी जवळपास महिनाभरापासून मोकाट आहेत. भरीसभर म्हणून तक्रारकर्त्या डॉक्टरला पोलिसांनी संरक्षणही नाकारले आहे.
डॉ. साईनाथ सीताराम बैरागी यांची कल्याण येथे दोन हॉस्पिटल्स आहेत. एका कार्यक्रमामध्ये त्यांचा परिचय पत्रकार स्टॅनले सॅम्युएल याच्याशी झाला होता. या पत्रकाराने आॅक्टोबर महिन्यामध्ये डॉ. बैरागी यांच्याकडे खंडणी मागितली. सात लाख रुपये न दिल्यास आपल्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांच्या वेबसाइटवर तक्रारी टाकण्याची धमकी त्याने दिली. डॉ. बैरागी यांनी १६ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी पत्रकारास अटक केली. मात्र, दोनच दिवसांत त्याचा जामीन मंजूर झाला.
खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस लगेच जामीन मिळत असेल, तर यातून तपासातील उणिवा उघड होतात, असा आरोप या पार्श्वभूमीवर होत आहे. याशिवाय, आरोपीच्या साथीदारास महात्मा फुले पोलीस ठाण्याची यंत्रणा अद्याप अटक करू शकली नाही. आरोपींविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याने डॉ. बैरागी यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.
मात्र, संरक्षणास पोलिसांनी नकार दिला. खंडणीच्या बºयाच प्रकरणांमध्ये तक्रारदार समोर येण्यास धजावत नाही. त्यामुळे आरोपींचे फावते. याच कारणांमुळे ठाणे जिल्ह्यात खंडणीखोरांचे पीक आले आहे. पोलिसांची ढिम्म भूमिका या परिस्थितीला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत हा प्रकार पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कानांवर घालण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतरही यंत्रणा हलगर्जी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सागर बैरागी यांनी दिला. या प्रकरणी पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता.

राष्ट्रवादीचा आंदोलचा इशारा

्नराष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे़ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत हा प्रकार पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कानावर घालण्यात आला होता़ त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आदेश दिले होते़ तरीही यंत्रणा हलगर्जीपणा करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा उपाध्यक्ष सागर बैरागी यांनी दिला आहे़
 

Web Title:  The accused pleaded for a ransom, the complainant refused to give police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.