महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

By admin | Published: July 29, 2016 07:56 PM2016-07-29T19:56:24+5:302016-07-29T19:56:24+5:30

महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली.

The accused in the women's sales case are arrested in Telhaa | महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

Next

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. २९ : महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली. अब्दूल सलाम अब्दूल सत्तार (६५, रा. दानापूर, जि.अकोला) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एक महिला कॅटरर्सचे काम करीत असताना तिची आरोपी चंदू उईके याच्याशी नागपूरमध्ये ओळख झाली होती. चंदूने तिला गुजरातमध्ये चांगले काम देण्याचे आमीष दाखविले होते. त्यामुळे ती महिला चंदूसोबत ७ नोव्हेंबर २०१४ रोजी गुजरातला गेली होती. त्यानंतर वर्षभर ती महिला अमरावती परतली नव्हती.

दरम्यान चंदूने त्या महिलेला राजस्थान येथील प्रफुल्ल लंगडा याला विक्री केली. नाईलाजाने ती महिला वर्षभर प्रफुल्लसोबत राहिली. मात्र, त्यानंतर प्रफुल्लने त्या महिलेला तेल्हारा येथील अब्दूल सलामच्या घरी ठेवले. दोन महिने त्या सलामकडे राहिल्यात. मात्र, त्यानेही आणखी एका व्यक्तीला विक्री केली. हा प्रकार सुरू असताना पीडित महिलेने अमरावतीमधील हिन्दू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला.

त्यावेळी शहरातील काही हिन्दू संघटनेचे कार्यकर्ता महिलेची मदत करून तिची राजस्थान येथील मागीलाल लखाराम यांच्या घरातून सोडवणूक केली. महिलेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी ५ एप्रिल २०१६ रोजी आरोपी चंदू उईके (रा.नागपूर), प्रफुल्ल लंगडा व उमेश दर्जी (गुजरात) या तिघांविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (२)(एन), ३६६, ३७०, ४१७ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणात पोलिसांनी चंदू उईकेला अटक केली होती व अन्य आरोपीचा शोध सुरूहोता. शुक्रवारी गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात तेल्हारा तालुक्यातील दानापूरकडे रवाना झाले होते. त्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. 

आयुक्तांच्या निर्देशानंतर तपासाला गती
शहर तपास संथगतीने सुरू असल्याचे पाहून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यानी लक्ष घालून गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांनी तत्काळ आरोपीचा मागोवा घेऊन त्याला अटक केली आहे. 

Web Title: The accused in the women's sales case are arrested in Telhaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.