नऊ गावांनी उभारली अखंड श्रमदानाची गुढी
By Admin | Published: March 28, 2017 08:13 PM2017-03-28T20:13:23+5:302017-03-28T20:26:19+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांनी अखंड श्रमदान करण्याची सामूहिक गुढी उभारली. शिर्ला येथे सरपंच रिना संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून पाण्यासाठी अभिनव संकल्प करण्यात आला.
शिर्ला गावाच्या मुख्य चौकात आज सकाळी ९ वाजता जलसैनिक गावकऱ्यांच्या उपस्थितीत संकल्प गुढी उभारली. ह्यदुष्काळाशी दोन हात, दुष्काळावर करू कायमची मात अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिर्ला गावात गतवर्षी सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून केलेली जलसंधारणाची विविध कामे, त्यामुळे बदलत चाललेले शेतकरी जीवन आणि यावर्षी प्रस्तावित कामाची माहिती सरपंच रिना शिरसाट यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय शिरसाट, ग्रा.पं. सदस्य सुनील अंधारे, प्रकाश उगले, जलसैनिक इम्रान खान, हरीश कोकाटे, स्वप्निल मुळे, राजेश, प्रवीण इंगळे, रघुनाथ बोचरे, गजानन गवरे, रामकृ ष्ण खंडारे, प्रकाश इंगळे, जगन्नाथ राऊत, संजय खाडे, देवीदास बळकार, गजानन बळकार, संजय गिऱ्हे, संजय इंगळे, सचिन इंगळे, शंकर लांडे, लता अंधारे, दत्तात्रय निलखन, डिगांबर उगले, राऊत, ज्ञानदेव हिरळकार आदी उपस्थित होते. यावेळी श्रमदानातून गावाला दुष्काळमुक्त करण्याची शपथ गावकऱ्यांनी घेतली. संचालन, प्रास्ताविक संतोषकुमार गवई यांनी केले.
सामूहिक गुढी उभारून केला संकल्प
पातूर तालुक्यातील शिर्ला, चिचखेड, चारमोळी, भंडारज, तांदळी, बेलुरा, अंधारसांगवी, शेकापूर, मळसूर आदी गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाणी फाउंडेशनची सामूहिक गुढी उभारून ग्रामस्थांनी अखंड श्रमदान करण्याचा संकल्प केला. चारमोळी या गावात सामूहिकपणे उभारलेल्या गुढीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्वच ग्रामस्थ सहभागी झाले होते. चारमोळी या गावात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १० खड्डे खोदून श्रमदान करण्याचा संकल्प करण्यात आला.
पाणी फाउंडेशनच्या वाटर कपमुळे आमचे चारमोळी गाव एकत्र आले आहे. आजपर्यंत गावात सामूहिकपणे गुढी कधीही उभारली गेली नव्हती; परंतु वॉटर कपच्या माध्यमातून श्रमदानामुळे सर्व गाव एकत्र आले आहे.
भीमाबाई हजारे, चारमोळी
https://www.dailymotion.com/video/x844utu