नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश

By Admin | Published: July 11, 2017 09:37 AM2017-07-11T09:37:58+5:302017-07-11T09:37:58+5:30

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 10 - नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्याने बुडालेल्या आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...

Achieving all the bodies in the Nagpur boat crash | नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश

नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश

Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्याने बुडालेल्या आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मृतदेह हाती आल्यानंतर अखेर बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. रविवारी सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटल्याने 11 तरुण जलाशयात बुडाले होते. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आलं होतं. यामध्ये दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश होता. 
 
बोट बुडाल्याची माहिती मिळताच शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं. राहुल जाधव, अंकीत भोस्कर, परेश कटीके, रोशन खांदारे आणि अक्षय खांदारे या पाच जणांचे मृतदेह सापडले होते. मात्र उर्वरित तीन मृतदेहांचा शोध सुरु होता. अतुल भोयर, पंकज डोईफोडे आणि प्रतिक आमडे हे तीन जण बेपत्ता होते. अखेर त्यांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सर्व मृतदेह सापडल्यानंतर रविवारी रात्रीपासून सुरु करण्यात आलेलं बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. 
 
संबंधित बातम्या 
आणखी सहा मृतदेह मिळाले
VIDEO : नागपुरातील वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह
 
दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. सहलीचा कसा आनंद घेत आहेत याची माहिती बोटीतील हे तरुण फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्रांना सांगत होते.  यावेळी काही जणांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. शिवाय, एवढे जण एका बोटीत कसे बसले आहात, असा प्रश्न उपस्थित करत भीतीदेखील व्यक्त केली होती. काही वेळानं ही बोट उलटून दुर्घटना घडली ज्यात 11 जण बुडाले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले होते. रविवारी (9 जुलै) संध्याकाळी ही दुर्घटना घडल्यानं अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.  
 
https://www.dailymotion.com/video/x84579z

नेमकी काय आहे घटना ?
अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी संध्याकाळी सहलीसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणं जिवावर बेतले. बोटीतून प्रवास करताना एकाच बाजूला अधिक भार झाल्यामुळे डोंगा असंतुलित होऊन उलटली. परिणामी 8 जणांना जलसमाधी मिळाली. या नावेत नाविकासहीत एकूण 11 जण होते.  
 
कळमेश्वर पोलिसांना या दुर्घटनेची माहिती तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळाली. पण त्यांनी लागलीच बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रात्री 9.30 वाजेपर्यंत तीन जणांना वाचवण्यात त्यांना यश आले होते. 
 
कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधोमध गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली. अतुल बावणे याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता इतर 10 जण जलाशयात बुडाले.

Web Title: Achieving all the bodies in the Nagpur boat crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.