छेडछाडीच्या वादातून महिलेवर अ‍ॅसिडहल्ला

By admin | Published: October 30, 2015 01:30 AM2015-10-30T01:30:51+5:302015-10-30T01:30:51+5:30

छेडछाड केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्यांवर एका तरुणाने अ‍ॅसिड फेकल्याने त्यात एका महिलेसह सहा जण भाजले. ही घटना गुरुवारी दुपारी बद्री प्लॉट भागात घडली़

Acidahalla on the woman's promise of teasing | छेडछाडीच्या वादातून महिलेवर अ‍ॅसिडहल्ला

छेडछाडीच्या वादातून महिलेवर अ‍ॅसिडहल्ला

Next

भुसावळ (जि. जळगाव) : छेडछाड केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्यांवर एका तरुणाने अ‍ॅसिड फेकल्याने त्यात एका महिलेसह सहा जण भाजले. ही घटना गुरुवारी दुपारी बद्री प्लॉट भागात घडली़
बद्री प्लॉट भागात मनोज विजयसिंग पाटील (२७) याची दूध डेअरी आहे़ त्याने एका विवाहितेची छेड काढली. त्याचा जाब विचारण्यासाठी ही महिला आणि पती विनोद मधुकर सोनार (३१) हे दुपारी साडेबाराच्या सुमारास दूध डेअरीवर गेले. त्यावेळी त्यांचा पाटीलशी वाद झाला. तेव्हा रिक्षाचालक हरीश शामराव पाटील (५७), प्रशांत प्रकाश पिंगळे (३०), सागर अरुण विसे (२१), विजय संतोष चौधरी (२६) यांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. पण मनोजने डेअरीमध्ये ठेवलेले अ‍ॅसिड या सर्वांच्या अंगावर फेकले आणि तिथून पळ काढला़ या सहाही जणांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत या घटनेची नोंद झालेली नव्हती.

Web Title: Acidahalla on the woman's promise of teasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.