चार परप्रांतीय आरोपींकडून घरफोडीतील १५ लाखांचा मुददेमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 05:00 PM2016-08-24T17:00:32+5:302016-08-24T17:06:19+5:30
शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या चार परप्रांतीय आरोपींकडून अंबड पोलिसांनी १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे़
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 : शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या चार परप्रांतीय आरोपींकडून अंबड पोलिसांनी १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे़ या संशयितांमध्ये चंदन ऊर्फ दीपक ब्रह्मदेव दुबे (२१, रा़सीताराम दातीर यांच्या घरात, महालक्ष्मी नगर, अंबड, नाशिक), अभिषेक उद्धव विश्वकर्मा (१९, रा़ प्लॉट नंबर ५०, रुम नंबर ४, स्वामीनगर, अंबड), प्रदीप केवट मंत्री ऊर्फ बाबा (२१, रा़ प्लॉट नंबर ५, गट नंबर ६८, कारगील चौक, दत्तनगर, अंबड, नाशिक) व म्रिनल राजेश्वर रभा ऊर्फ एम.के राजू ऊर्फ आसामी (२९, रा़ फडोळ मळा, डीजीपी नगर, अंबड, नाशिक) यांचा समावेश आहे़ .
या चौघांकडून पोलिसांनी १३ एलईडी टीव्ही, ७ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, ३ दुचाकी वाहने, १ होंडा सिटी कार, एक सोनी कंपनीचा कॅमेरा, साऊंड सिस्टीम असा १४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, पोलीस उप आयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बांबळे, पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़