हत्या प्रकरणातून दाम्पत्याची निर्दोष सुटका
By Admin | Published: April 17, 2017 03:14 AM2017-04-17T03:14:33+5:302017-04-17T03:14:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील आरोपी दाम्पत्याची निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाने या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील आरोपी दाम्पत्याची निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाने या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती
प्रल्हाद (६९) व इंदुबाई मढार (५९) अशी संशयित आरोपींची नावे असून ते कवठा-बहाळे, ता. भातकुली (अमरावती) येथील रहिवासी आहेत. आरोपी प्रल्हादने डिलरशीप मिळवून देण्यासाठी जयराम बोरकरकडून सात लाख घेतले होते. परंतु, काम न झाल्यामुळे बोरकर पैसे परत मागत होता. २९ डिसेंबर २०१० रोजी प्रल्हादने बोरकरला काठीने मारहाण केली. त्यावेळी इंदुबाईने त्याला पकडले होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या बोरकरचा मृत्यू झाला.
सत्र न्यायालयाने प्रल्हाद व इंदुबाई या दोघांना भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. (प्रतिनिधी)