मुंबई-पुणे मार्गावर ५५९ वाहनांवर कारवाई
By admin | Published: June 12, 2016 04:32 AM2016-06-12T04:32:24+5:302016-06-12T04:32:24+5:30
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष मोहीम हाती घेतली असून, या
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ९ ते १७ जून या कालावधीत २४ तास ही मोहीम परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाची दोन वायुवेग पथके व चार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय महामार्ग पोलिसांकडून वडगाव आणि खंडाळा येथे २४ तास वाहनांची तपासणी सुरू आहे. (प्रतिनिधी)
कशाची होते तपासणी... भारक्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणारी वाहने, अतिवेगाने चालणारी वाहने, लेन कटिंग, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, लांब पल्ल्याच्या बस आणि ट्रकमध्ये दोन चालक नसणे, सीटबेल्टचा वापर न करणे
वाहनचालकांना आवाहन : वेगमर्यादा पाळा, लेन कटिंग करू नका, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नका,
प्रादेशिक परिवहनची कारवाई
तारीखदोषी वाहनेदंड
९ जून१२६५१,०००
१० जून१४०१,८९,५५०
महामार्ग पोलिसांची कारवाई
तारीखदोषी वाहनेदंड
९ जून१७९२१,८००
१० जून११४११,८००