‘सल्ला घेऊन बेळगाव महापालिकेवर कारवाई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2016 03:44 AM2016-11-12T03:44:56+5:302016-11-12T03:44:56+5:30

बेळगाव महापालिकेवरील कारवाईसंदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे संकेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.

'Action against Belgaum municipal corporation' | ‘सल्ला घेऊन बेळगाव महापालिकेवर कारवाई’

‘सल्ला घेऊन बेळगाव महापालिकेवर कारवाई’

googlenewsNext

बेळगाव : बेळगाव महापालिकेवरील कारवाईसंदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे संकेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, सौंदत्ती तालुक्यातील दुष्काळ भागाचा दौरा करण्यासाठी सिद्धरामय्या यांचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.
बेळगाव महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर १ नोव्हेंबर रोजी आयोजित काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले. मात्र, राजस्वच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यावरून त्यांना नोटीस बजावली होती. याचा अहवाल जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे.
मराठी नगरसेवकांत फूट?
महापालिका बरखास्त केल्याने सर्व नगरसेवकांचे नुकसान होईल त्यामुळे फक्त महापौर, उपमहापौरांवर कारवाई करावी, अशी मागणी कानडी, उर्दू भाषिक नगरसेवकांनी विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, मराठी गटातील पाच नगरसेवकसुद्धा या मागणीवेळी उपस्थित होते. त्यामुळे मराठी नगरसेवकांतील फूट पुन्हा एकदा उघड झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Action against Belgaum municipal corporation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.