बोगस देशी दारू, ताडी, निरा उत्पादनाविरुद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:05 AM2020-12-15T02:05:11+5:302020-12-15T02:05:49+5:30

‘एफडीए’ची राज्यातील पहिलीच मोहीम

Action against bogus liquor tadi and nira product | बोगस देशी दारू, ताडी, निरा उत्पादनाविरुद्ध कारवाई

बोगस देशी दारू, ताडी, निरा उत्पादनाविरुद्ध कारवाई

googlenewsNext

-  अतुल कुलकर्णी 

मुंबई : अत्यंत घाणेरड्या वातावरणात, स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून बनविण्यात येत असलेली देशी दारू, ताडी, माडी आणि नीरा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यात सापडली. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बोगस दारू विकली जाणार असल्याची खबर मिळताच एफडीए, एक्साईज आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच मोहीम आहे.
एफडीएने नाशिकमध्ये टँगो देशी दारूच्या कारखान्यावर छापा मारला. संत्रा, फाईन टँगो पंच, टँगो प्रीमियर आदी आढळून आले.  अन्नपदार्थांच्या लेबलवर मात्र ‘ऊस मळीच्या मद्यार्कात कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली’ असे उल्लेख होते. त्यावर केवळ ‘रेक्टिफाईड स्पिरिट’ एवढाच उल्लेख होता. ऊस मळीपासून तयार करण्यात आल्याबद्दलचा कोणताही उल्लेख तेथे नव्हता. शिवाय या तपासणीत असंख्य घातक पदार्थही आढळून आले. वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता. त्याची तपासणी होत नव्हती. अशा असंख्य गोष्टी तेथे होत्या. त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असे छापे मारण्यात आले. ज्यात कोल्हापूर, रायगड, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा विविध शहरांचा समावेश आहे.

भेसळीविरोधात मोहीम 
सुरुवातीच्या काळात काही कारखान्यांचे दारूचे उत्पादन एफडीएने थांबविले. मात्र उत्पादन थांबविणे हा उपाय नाही. भेसळयुक्त दारू बनविणे आणि विकली जाऊ नये, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

एफडीए, एक्साईजकडून संयुक्तपणे तपासणी
फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ॲक्ट २००६ नुसार ‘अल्कोहोलिक ड्रिंक’चा समावेश ‘अन्न’ या घटकात करण्यात आला आहे. 
 योग्य त्या प्रमाणात अल्कोहोलचे मिश्रण होते की नाही हेदेखील तपासण्याचे अधिकार एफडीएला दिले आहेत. एफडीए, एक्साईज आणि जिल्हाधिकारी यांच्या विद्यमाने राबवली जात आहे. ही माहिती एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

राज्याचा महसूल बुडू नये म्हणून दक्षता
 अल्कोहोलचे प्रमाण किती आहे यानुसार एक्साईज लावण्याचे काम केले जाते. अल्कोहोलचे प्रमाण तपासण्याचे काम एफडीएचे आहे.  
 त्यानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून काळे म्हणाले, बोगस दारू बनविणे आणि विकणे यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. ‘बोगस दारूचे बळी’ अशा बातम्या येतात. दुसरीकडे राज्याचा महसूल बुडतो. हे होऊ नये यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Action against bogus liquor tadi and nira product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :FDAएफडीए