अवैध बांधकाम प्रकरणी दोषींवर कारवाई - पाटील

By admin | Published: April 7, 2017 05:59 AM2017-04-07T05:59:21+5:302017-04-07T05:59:21+5:30

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामाच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

Action against guilty in illegal construction case - Patil | अवैध बांधकाम प्रकरणी दोषींवर कारवाई - पाटील

अवैध बांधकाम प्रकरणी दोषींवर कारवाई - पाटील

Next

मुंबई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामाच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. अवैध बांधकाम प्रकरणामध्ये अधिकारी, विकासक तसेच अन्य कोणाचाही समावेश आढळल्यास त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
वसई- विरार येथील अवैध बांधकामासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, वसई- विरार शहरातील अवैध बांधकामासंदर्भात तक्रार आल्यावर त्यासंदभार्तील सविस्तर अहवाल पालिकेकडे मागविण्यात आला होता. अहवालात विकासकाने अतिरिक्त अनधिकृत बांधकाम केले असल्याचे आढळून आले आहे. म्हणून या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येतील. (प्रतिनिधी)

Web Title: Action against guilty in illegal construction case - Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.