अश्विनी बिद्रे प्रकरणी एकाला पुण्यातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:15 AM2018-02-28T03:15:30+5:302018-02-28T03:15:30+5:30
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी...
नवी मुंबई : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी महेश फळणीकर याला पुण्याहून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या चार झाली आहे.
अश्विनी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुं दकर याला ७ डिसेंबर २0१७ रोजी अटक केली होती. या प्रकरणात मदत केल्याच्या संशयावरून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला १0 डिसेंबर २0१७ रोजी अटक करण्यात आली होती. तसेच कुरुं दकरचा चालक कुंदन भंडारी यालाही गेल्या आठवड्यात अटक झाली.
या प्रकरणातील चौथा आरोपी महेश फळणीकर व अभय एकाच गावातील आणि बालमित्र आहेत. मंगळवारी कुंदन व महेश यांना पनवेल न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.