मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:14 AM2023-09-28T11:14:33+5:302023-09-28T11:15:37+5:30

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही असं रोहित पवार म्हणाले.

Action against Rohit Pawar's company; Action taken at the behest of 2 big leaders? | मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

googlenewsNext

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली. राज्यातील २ मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे असं त्यांनी स्पष्ट केले.

त्याचसोबत ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही असा टोलाही आमदार रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

दरम्यान, आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.

Web Title: Action against Rohit Pawar's company; Action taken at the behest of 2 big leaders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.