पथदिवे दुरुस्तीत गैरव्यवहार आढळल्यास दोषींवर कारवाई
By Admin | Published: December 10, 2015 02:56 AM2015-12-10T02:56:32+5:302015-12-10T02:56:32+5:30
औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदामध्ये २२ तुकडे पाडण्याची अनियमितता सकृतदर्शनी दिसून येते.
नागपूर : औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदामध्ये २२ तुकडे पाडण्याची अनियमितता सकृतदर्शनी दिसून येते. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे. चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी व क र्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत दिली.
महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ५०लक्ष रुपयाचे कामाचे ई -निविदा न करता २२ भाग करून एकाच ठेकेदाराला सर्व काम देण्यात आले आहे. एका कामासाठी तीनपेक्षा अधिक निविदा आल्या तरच त्या ओपन केल्या जातात. येथे फक्त दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्या ओपन करून हितसंबंध असणाऱ्या ठेकदाराला दिल्याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, अब्दुल्लाखान दुर्रानी व अमरसिंह पंडित आदींनी उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)