माथेरानमध्ये घोडेवाल्यांवर कारवाई
By Admin | Published: April 26, 2016 02:47 AM2016-04-26T02:47:03+5:302016-04-26T02:47:03+5:30
माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, जंगलाने स्वयंपूर्ण असे पर्यटनस्थळ. गेली काही वर्षे या वनाला माणसाची नजर लागली होती.
माथेरान : माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, जंगलाने स्वयंपूर्ण असे पर्यटनस्थळ. गेली काही वर्षे या वनाला माणसाची नजर लागली होती. माथेरानचे प्रवेशद्वार असलेले दस्तुरी येथील जंगल बकाल होण्याच्या मार्गावर होते, अखेर वन विभागाला जंगल वाचविण्यासाठी जाग येऊन जंगलात अनधिकृत घोडे बांधणाऱ्या घोडेवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
माथेरान परिसराबाहेरील घोडेवाले आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दस्तुरी येथे घोडे आणतात आणि ते झाडाला बांधून पर्यटकांच्या मागे धावतात. संध्याकाळी ते घोड्याला घेऊन आपल्या गावी जात असत. काही महिन्यांनी त्याच घोडेवाल्यांनी आपले बस्तान दस्तुरी येथील जंगलात बसविले. घोड्याच्या मलमुत्रामुळे येथील झाडे सुकून गेली, परिणामी हा संपूर्ण परिसर बकाल झाला. लोकांनी खूप तक्र ारी करूनही वन विभाग लक्ष देत नव्हता. अखेर वन विभागाच्या महिला डीएफ ओ बॅनर्जी यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने माथेरानचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष पाटील व वनपाल वसंत कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाईस सुरु वात केली. त्यावर मूळवासीय अश्वपाल संघटनेच्या घोडेवाल्यांनी त्यास तीव्र विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. एका दिवसात येथील घोडे हटवले नाही तर कारवाई करु असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.