बेकायदा हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई

By admin | Published: November 15, 2015 02:13 AM2015-11-15T02:13:06+5:302015-11-15T02:13:06+5:30

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वरसोली येथे मनशक्ती आश्रमाशेजारी अनधिकृतपणे उभारलेल्या सकर भवन या हॉटेलवर कारवाई झाली. तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

Action on illegal hotels, restaurants | बेकायदा हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई

बेकायदा हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई

Next

लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वरसोली येथे मनशक्ती आश्रमाशेजारी अनधिकृतपणे उभारलेल्या सकर भवन या हॉटेलवर कारवाई झाली. तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.
वरसोली गावात गट नं. ६९/१ या मिळकतीमध्ये धर्मादाय संस्थेच्या नावाखाली मुंबईस्थित काही मंडळींनी सकर भवन हे ३९ रूमचे हॉटेल बांधले आहे. नानुमल भोगराज हे रेस्टॉरंट सहा महिन्यांपासून सुरूकरण्यात आले होते. मात्र, या बांधकामासाठी पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच लॉजिंग बोर्डिंग व रेस्टॉरंटदेखील विनापरवाना सुरूहोते. हे महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर सकर भवनच्या व्यवस्थापनाला परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दोन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आली होती. व्यवस्थापनाने या सूचनेकडे दुलक्ष केले. त्यामुळे मावळ महसूल विभागाने बांधकाम व हॉटेल रेस्टॉरंट बेकायदा असल्याची नोटीस प्रवेशद्वारावर लावली.
लोणावळा ते देहूरोडदरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी परवानगी घेतली आहे काय, हे तपासण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. , अशी माहिती मावळचे तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

Web Title: Action on illegal hotels, restaurants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.