शाळा व्यवस्थापन निवडणुकीत हाणामारी
By admin | Published: December 30, 2016 10:12 PM2016-12-30T22:12:25+5:302016-12-30T22:12:25+5:30
जि.प.उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत शाळा समितीच्या निवडणुकीवरुन शुक्रवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली
ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा (बुलडाणा), दि. 30 - साखरखेर्डा येथील जि.प.उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत शाळा समितीच्या निवडणुकीवरून शुक्रवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, दोन्ही गटातील ४० ते ४५ व्यक्तींविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
३० डिसेंबर रोजी मुख्याध्यापक अनिस पटेल यांनी शाळा समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी निवडणूक बैठक बोलावली होती. १ ते ७ मधील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून १४ सदस्यांची निवडणूक सकाळी १० वाजता होणार होती. सर्व पालक आणि इतर लोक शाळेत एकत्रीत जमा झाले होते. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याअगोदर गैरपालक व्यक्तींना प्रथम शाळेबाहेर काढा,
असा आरोप काही पालकांनी केला. यावरुन दोन गटात प्रथम शाब्दीक चकमक झाली. काही युवकांनी हातात काठ्या, रॉड घेवून शाळेत गोंधळ घातला. यातच पळापळ होवून शाळेबाहेर काही पालकांना बेदम मारहाणही करण्यात आली. दोन्ही गटातील
जमावाने हातात काठ्या रॉड घेवून गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.
या कारणावरुन ए.एस.आय. आयुब खान यांच्या तक्रारीवरुन इब्राहीम शहा अब्दुल शहा, दाऊद शे.मुसा कुरेशी, शे.युनूस शे.यासीन, शरीफ लाला, शे.सिकंदर शे.युसूफ, शे.बशिर शे.बाबु, शे.रशिद शे.निसार, शे.इमरान शे.चाँद, शे.जावेद शे.हबिब, शे.वसिम शे.रहीम, शे.फरीद शे.हमीद, शे.इमरान शे.गुलाब, शे.रईस शे.वजीर, सिकंदर शहा, शे.तौसीफ शे.तसलीम व इतर २५ ते ३० व्यक्तींवर १३५ बी.पी.अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर इब्राहीम शहा यांच्या तक्रारीवरुन शे.दाऊद शे.मुसा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि अनिस कुरेशी यांचेसह १५ ते २० व्यक्तींविरुद्ध कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आज शुक्रवारला आठवडी बाजार असल्याने गावात शांतता भंग होवू नये म्हणून ठाणेदार निलेश ब्राम्हणे, पीएसआय मधुकर मैंद, गणेश मैंद, गजानन मुंढे,
पो.कर्मचारी गणेश गाभणे, युवराज साळवे, गणेश ढवळे, संजय कोल्हे, अशपाक शेख, आयुब खान, मदन गीते, संजय कऱ्हाळे, अरविंद देशमुख, अशोक काशिकर, गजानन दराडे, प्रदिप मोटे, परमेश्वर आढाव, म्हस्के, मापारी यांनी जमावाला
पिटाळून लावले आणि दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला. काही आरोपींना ताब्यात घेतले असून, अटकसत्र सुरु केले आहे.