नामांकित कंपन्यांवर कारवाई
By admin | Published: October 18, 2016 05:37 AM2016-10-18T05:37:25+5:302016-10-18T05:37:25+5:30
एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून त्याची मॉल व दुकानांमधून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले
मुंबई : एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून त्याची मॉल व दुकानांमधून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पॅकबंद पाणी वेगवेगळ्या किमतीला विकणाऱ्या हिंदुस्थान कोकाकोला (किनल) पेप्सीको (अॅक्वाफिना), रेडबूल इंडिया (रेडबूल), युरेका फोर्ब्स (अॅक्वाशुअर), पिटेल्स अॅक्वा आणि अॅग्रो फूडस् या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी राज्यातील ३४५ दुकानांची तपासणी करून १३४ दुकानांवर खटले दाखल केल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
याशिवाय, एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील सिनेमा व्हेंचर्स प्रा. लि., मेट्रो मेनलाईन, आयनॉक्स लेसर, नरिमन पॉइंट येथील आर टू मॉल, सुवर्णा फिल्म एंटरप्रायजेस, एरॉस थिएटर, फिनिक्स मिल कपाउंडमधील
पी. व्ही. आर. फिनिक्स, चिंचपोकळीतील जयहिंद सिनेमा हॉल, कांदिवलीतील आॅरेंज हॉटेल रेस्टॉरंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेकर्स स्ट्रीट, सांताक्रूज विमानतळ येथील शिवसागर व्हेज रेस्टॉरंट, मिलीयम एजन्सी प्रा. लि., अरायव्हल प्लाझा, द ग्रेट कबाब फॅक्टरी, घाटकोपर येथील आयनॉक्स टॉकिज व आरसिटी मॉल, नील स्क्वेअर मॉल, एलबीएस मार्ग येथील कार्निव्हल कंपनी प्रा. लि. या आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील खारघर येथील सिनेमा व्हेंच्युरी, पीव्हीआर, पनवेलमधील ओरयान मॉल, अप्पार क्रस्ट फूडस्प्रा. लि., ओरियान मॉल, खालापूर येथील एडलॅब्स एंटरटेनमेंट लि. आणि पुण्यातील बंडगार्डन येथील आयनॉक्स लेजर, हडपसर येथील सिनेपोलीस सिझन मॉल्स, मगरपट्टा येथील आयनॉक्स अमनोरा मॉल्स तसेच नागपूरमधील व्हरायटी स्क्वेअर येथील सफायर फूड प्रा. लि. यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>कंपनीला बजावली नोटीस
बाटलीबंद पाणी विकणाऱ्या हिंदुस्थान कोकाकोला, पेप्सीको इंडिया होल्डिंग, रेडबूल इंडिया आणि युरेका फोर्ब्स या नामांकित कंपन्यांनी एकसमान आकाराच्या बाटल्यांी वेगवेगळ्या किंमतीने विक्री केल्याचे उघडकीस आल्याने या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.