डेक्कन क्वीन रोखणा-या प्रवाशांवर कारवाई, तीन महिलांना अटक

By admin | Published: July 12, 2017 08:30 PM2017-07-12T20:30:19+5:302017-07-12T20:30:19+5:30

पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी डेक्कन क्वीन रोखणा-या सुमारे १०० प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असून त्यातील तीन महिलांना अटक करण्यात आली.

Action on the passengers of the Deccan Queen Rokhana, the arrest of three women | डेक्कन क्वीन रोखणा-या प्रवाशांवर कारवाई, तीन महिलांना अटक

डेक्कन क्वीन रोखणा-या प्रवाशांवर कारवाई, तीन महिलांना अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी डेक्कन क्वीन रोखणा-या सुमारे १०० प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असून त्यातील तीन महिलांना अटक करण्यात आली.
 
सीमा सुहास गाडगीळ (वय ५५), वर्षा योगेश रेळे (वय ५०), फातीमा जाफर हुसेन (५४) अशी या महिलांची नावे आहेत़ गाडगीळ आणि रेळे या मुंबई महापालिकेत अधिकारी आहेत़ रेल्वे फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांना पकडण्यात आले़ त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
 
गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरुन सोडण्यात येणारी डेक्कन क्वीन फेब्रुवारीपासून फलाट क्रमांक ५ वरुन सोडण्यास सुरुवात केली आहे़ फलाट क्रमांक १ व ५ वरच २४ डब्ब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात़ अन्य फलाट इतके लांब नाहीत़ त्यामुळे झेलम एक्सप्रेस व अन्य गाड्या फलाट १वर थांबविण्यात येऊ लागल्याने डेक्कन क्वीन फलाट क्रमांक ५ वरुन सोडण्यात येऊ लागली आहे़ याचा नियमित प्रवाशांना त्रास होत असल्याने ती नेहमीप्रमाणे फलाट क्रमांक १ वरुन सोडावी अशी मागणी नियमित प्रवाशांकडून होत होती़ परंतु, ती मान्य न झाल्याने सोमवारी आंदोलन करुन डेक्कन क्वीन सुमारे एक तास रोखण्यात आली होती.
 
याबाबत पुणे प्रादेशिक रेल्वे महाव्यवस्थापक बी़ के़ दादाभोय यांनी सांगितले की, अशा राष्ट्रविरोधी घटना कधीही सहन केल्या जाणार नाही़ त्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल़ गाड्या वेळेवर चालविण्यासाही प्रवाशांनी सहकार्य करावे़ त्यांनी कायदा हातात घेऊन नये, असे आवाहन त्यांनी केले़

Web Title: Action on the passengers of the Deccan Queen Rokhana, the arrest of three women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.