मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील जेवणात भेसळ आढळल्यास अॅट्रोसीटीनुसार कारवाई
By admin | Published: March 23, 2017 10:55 PM2017-03-23T22:55:00+5:302017-03-23T22:55:00+5:30
वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा होणे असे प्रकार गेली अनेक वर्षे सतत घडत असून
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. २३ – वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा होणे असे प्रकार गेली अनेक वर्षे सतत घडत असून, अन्न धान्य भेसळ करण्यात येते हे प्रकार रोखण्यासाठी अशी घटना घडल्यास संबंधित कंत्राटदारावर यापुढे अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर केली.
चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्याची घटना २२ फेब्रुवारी २०१७ रोजी आढळून आली. त्यापूर्वी जेवणात काचेचे तुकडे, गोगलगाय आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. तर राज्यातील विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात येत असल्याकडे विधानसभेत लक्षवेधी सुचनेमार्फत लक्ष वेधण्यात आले होते. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी याबाबत सरकारने कठोर उपयोजना करण्याची आवश्यकता आहे असे सांगत अशा प्रकारे कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल काय असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी ही सूचना मान्य करत यापुढे अशा घटनांवर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे घोषित केले.