बालकामगार आढळलेल्या दुकानमालकावर कारवाई

By admin | Published: July 21, 2014 10:20 PM2014-07-21T22:20:09+5:302014-07-21T22:20:09+5:30

मुख्य बाजारपेठेत असलेल्या ‘सोना नॉव्हेल्टी’ मध्ये बालकामगार आढळून आल्याने सदर दुकान मालकावर कारवाई करण्यात आली.

Action for the shopkeeper found in the workforce | बालकामगार आढळलेल्या दुकानमालकावर कारवाई

बालकामगार आढळलेल्या दुकानमालकावर कारवाई

Next

वाशिम: शहरामधील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ह्यसोना नॉव्हेल्टीह्ण मध्ये बालकामगार आढळून आल्याने सदर दुकान मालकावर कारवाई करण्यात आली. ही घटना आज १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार पाटणी चौकामध्ये असलेल्या सोना नॉव्हेल्टी या जनरल स्टोअर्समध्ये सरकारी कामगार अधिकार्‍याच्या पथकाने १९ जुलै रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये पथकाला एक १७ वर्षीय बालकामगार आढळून आला. या पथकाने दुकान मालक विजय मुरलीधर गुरुबक्षाणी यांच्यावर भारतीय दंड संहिता नियम ३१४, ज्युनिअल जस्टीस अँक्ट २000, २00६ अन्वये वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामगार अधिकार्‍यांच्या पथकामध्ये संरक्षण अधिकारी भीमराव चव्हाण, कामगार अधिकारी प्रशांत महाले, आत्माराम धनगर, पोलिस शिपाई प्रमोद थोरवे, दिलीपकुमार लेकुळे यांचा समावेश होता. शहरातील बहुतांश दुकानांमध्ये सद्य:स्थितीत बालकामकार कामावर आहेत. मात्र, सरकारी कामगार अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होते. १९ जुलैला मात्र अधिकार्‍यांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून, सरकारी कामगार अधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणून गेले आहेत.

Web Title: Action for the shopkeeper found in the workforce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.