तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 08:16 PM2018-10-06T20:16:06+5:302018-10-06T20:30:13+5:30

शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी : पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Action on stopping work of god temples area progress: departmental commissioner | तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

Next
ठळक मुद्देपरस्पर काम बदलणा-या एजन्सी काळ्या यादीतविकासांतर्गत कामांसाठी समन्वयाने चर्चा करून भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश

पुणे : तीर्थ क्षेत्र विकास आरखड्यांतर्गत कोणत्याही कामांना यापुढे कार्योत्तर मंजूरी दिली जाणार नाही, असे करणा-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल,असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिला. तसेच आराखड्यातील कामे परस्पर बदलणा-या एजन्सीची कामे काढून घेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या स्पष्ट सूचनाही संबंधित अधिका-यांना दिल्या. 
श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखी तळ, मार्ग विकास आराखडाविषयी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, तीर्थक्षेत्र विकासचे विशेष कार्यअधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी.तसेच्य विकास कामांच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवावे,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिल्या.तसेच तसेच पालखीमार्ग, पालखीतळ विकासांतर्गत कामांसाठी समन्वयाने चर्चा करून भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
या बैठकीत पंढरपूर येथील नवीन दिंडी पालखीतळ, शेगाव दुमला रस्ता, दुतर्फा वृक्ष लागवड करणे या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे, तसेच येथील 65 एकर क्षेत्रातील एमटीडीसी च्या पाठीमागील जागेत मुरमीकरण करून प्लॉट पाडणे, सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगाव, पिराची कुरोली येथील पालखीत तळाच्या ठिकाणी सेप्टीक टँक बांधणे. तसेच पंढरपूर-पिराची कुरोली या रस्त्याचे सर्वेक्षण करून या कामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.त्याचप्रमाणे पंढरपूर येथील महात्मा फुले ते गोपाळपूर चौक रस्ता रूंदीकरण व सुधारणा करण्यासाठी विद्युत वाहिनीचे स्थलांतर करणे, पंढरपूर येथील 65 एकर क्षेत्रामध्ये पोलिसांसाठी 6 लोखंडी वॉच टॉवर बांधणे तसेच या ठिकाणच्या प्रवेशव्दाराजवळ उजव्या बाजूला आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे बांधकाम करण्यास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विकास आरखड्यांतर्गत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील उद्यान संरक्षण भिंत बांधणे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपट आणि ज्ञानेश्वरीवर आधारीत चित्र व ध्वनीफित तयार करणे या कामांच्या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
 ................
पालखी तळांवर कायमस्वरूपी स्वच्छतागृह 
 पालखी तळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधणे तसेच यासाठी निर्मववारी अभियानातील सदस्यांना सहभागी करून घेण्यावर चर्चा झाली. तसेच मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या स्मारक उभारणीचा आढावा घेण्यात आला.यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन मंडपास मिळणा-या स्कायवॉकच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Action on stopping work of god temples area progress: departmental commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.