निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४० जण बडतर्फ, संपातून माघार न घेतल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:04 AM2021-12-30T06:04:34+5:302021-12-30T06:06:14+5:30

ST employees : महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १०,७६४  कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Action taken against 40 of the suspended ST employees for not withdrawing from the strike | निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४० जण बडतर्फ, संपातून माघार न घेतल्याने कारवाई

निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४० जण बडतर्फ, संपातून माघार न घेतल्याने कारवाई

Next

मुंबई :  वारंवार आवाहन करून संपातून माघार न घेतल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी एसटी महामंडळाने ४० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६०३ वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने १०,७६४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 

महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १०,७६४  कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. २,७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आता  निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे. गेल्या १५ दिवसांत १५३९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजावली.

Web Title: Action taken against 40 of the suspended ST employees for not withdrawing from the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.