आयुक्तांचा दे दणका! महापालिकेच्या नगररचना विभागातील आर्किटेक्टवर बडतर्फीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 08:44 PM2021-06-01T20:44:45+5:302021-06-01T20:50:00+5:30

या तक्रारीची राज्याच्या मुख्यमंत्री व नगरविकास खात्याने गंभीर दखल घेतली होती.

action taken against the architect of the vasai virar municipal town planning department | आयुक्तांचा दे दणका! महापालिकेच्या नगररचना विभागातील आर्किटेक्टवर बडतर्फीची कारवाई

आयुक्तांचा दे दणका! महापालिकेच्या नगररचना विभागातील आर्किटेक्टवर बडतर्फीची कारवाई

googlenewsNext

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क - वसई  

वसई :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील वास्तुविशारद (आर्किटेक्ट) तालिकेवरील सदस्य सनत एन.मेहता, रा.  बोरिवली (vvcmc/Lic.eng.09) यांनी कथीतपणे 'दि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थेची बोगस पदविका धारण केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांच्या आदेशाने  त्यांचे तालिका सदस्यत्वच रद्द केल्याची माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक शिवा एस. रेड्डी यांनी लोकमत ला दिली. या गंभीर प्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी अभियंता सनत एन मेहता यांना पालिकेच्या नगररचना विभागास आदेश दिल्यानुसार उपसंचालक यांच्या स्वाक्षरीने दि. १६ एप्रिल २०२१ रोजीच्या पत्रांनव्ये बडतर्फ म्हणून सूचित केले आहे.

या तक्रारीची राज्याच्या मुख्यमंत्री व नगरविकास  खात्याने गंभीर दखल घेत वसई विरार शहर महापालिकेच्या नगररचना विभागाकडे नगरविकास खात्याच्या अव्वर सचिव निकेता पांडे यांनी स्पष्टीकरण मागवले होते. अखेर सखोल चौकशी व उपलब्ध कागदपत्रांच्या छाननीनंतर वास्तुविशारद सनत एन मेहता याच्यावर महापालिका प्रशासनाने बडतर्फीची  कारवाई केली आहे.

दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या या दणकेबाज  कारवाईनंतर या प्रकरणातील मूळ तक्रारदार शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील मुळ्ये  यांनी नगररचना विभागातील वास्तुविद्या विशारद तालिका सदस्य या नात्याने सनत एन मेहता यांनी दिलेल्या सूचना, या सूचनांच्या आधारे वसई विरार चा विकास आराखडा निर्मिती प्रक्रियेत घेतलेले विविध निर्णय याचे पुनर्विलोकन करण्याची मागणी सुद्धा यानिमित्ताने नगरविकास व पालिका प्रशासनाकडे केली असल्याचे 'लोकमत'ला सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मुळ्ये यांनी सांगितले की,हा सर्व प्रकार अतिशय गंभीर  असून महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वास्तुविद्या विशारद तालिकेतील  सदस्य शहराच्या विकास आराखड्याच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देत असतात 
या प्रक्रियेत अनेक वेळा विविध भूखंडाशी निगडीत हितसंबंधांचा प्रश्न असतो, त्यामुळे कथीतपणे खोट्या पदविकेच्या आधारे 'रा' चा 'ता' दाखवून मान उंच करत आजवर वास्तुविशारद तालिकेवर विराजमान राहिलेल्या सनत एन मेहता यानी घेतलेल्या निर्णयांचे पुनर्विलोकन होणं अत्यंत गरजेचे असल्याचे सुनील मुळ्ये सांगत आहेत. या संदर्भात बडतर्फ करण्यात आलेले पालिका नगररचना विभागाचे तालिकेवरील अभियंता सनत मेहता यांना संपर्क केला असता मात्र तो झाला नाही.

सनत मेहता यांच्यावरिल कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहून केली आहे तसे लेखी निर्देश त्यांना दि 16 एप्रिल 2021रोजी देण्यात आले आहेत तर केलेल्या कारवाईचा अहवाल नगरविकास खात्यास दिला आहे. इतर बोगस अभियंत्यावरील कारवाई साठी आता आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे व त्यानुसार चौकशी सुरू आहे. - शिवा एस रेड्डी, उपसंचालक, नगररचना विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका (मुख्यालय)

Web Title: action taken against the architect of the vasai virar municipal town planning department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.