अवैध डाळींचा साठा अढळल्यास मोक्काची कारवाई

By admin | Published: October 20, 2015 09:10 PM2015-10-20T21:10:34+5:302015-10-20T21:10:34+5:30

डाळींचा अवैध साठा सापडल्यास त्यावर मोक्का किंवा एमपीडीए अंर्तगत कारवाई करण्यात येईल,असा आदेश अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे.

Action taken by illegal pulses | अवैध डाळींचा साठा अढळल्यास मोक्काची कारवाई

अवैध डाळींचा साठा अढळल्यास मोक्काची कारवाई

Next
>ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.२० - डाळींचा अवैध साठा सापडल्यास त्यावर मोक्का किंवा एमपीडीए अंर्तगत कारवाई करण्यात येईल, असा आदेश अन्न आणि औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. तसेच नोंद नसलेल्या डाळीचा साठा जप्त करुन त्याचा लिलाव केला जाईल, असंही गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
 
देशात तूरडाळीच्या २०० रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर लोकांमधील आक्रोष वाढल्यानंतर अखेर सरकार जागे झाले आणि सरकारने राज्यभर २७० ठिकाणी धाड टाकल्या आहेत. मागील २४ तासात १६ जिल्ह्यांमध्ये २७६ ठिकाणी छापा टाकून डाळीचा अवैध साठा आणि काळा बाजार सुरु आहे का याची तपासणी केली.  पुणे, सोलापूर ,औरंगाबाद, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, अहमदनगर या ठिकाणी सरकारने छापा टाकला.
 
राज्यात डाळी, खाद्यतेले आणि तेलबियांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध ३० सप्टेंबर २०१६पर्यंत लागू असणार आहेत. यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये डाळी आणि खाद्यतेलांच्या साठवणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. आजच्या आदेशानुसार डाळी, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर सरकारने फेब्रुवारी २०१०मध्ये लागू केले तसे निर्बंध लागू राहतील.

Web Title: Action taken by illegal pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.