शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणप्रकरणी तातडीने कार्यवाही - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:32 AM2018-07-21T05:32:16+5:302018-07-21T05:32:52+5:30

मुंबई मनपा प्रभाग क्र. ८६ मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात ३५२ ची नोटीस बजावली जाईल.

Action Taken promptly for encroachment on school reserved plot - Dr. Ranjeet Patil | शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणप्रकरणी तातडीने कार्यवाही - डॉ. रणजित पाटील

शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणप्रकरणी तातडीने कार्यवाही - डॉ. रणजित पाटील

Next

नागपूर : मुंबई मनपा प्रभाग क्र. ८६ मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात ३५२ ची नोटीस बजावली जाईल. तसेच यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
सदस्य सुधाकर देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील यांनी सांगितले, या बांधकामाबाबत ३१ मार्च २०१८ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ११ एप्रिल २०१८ व ३ मे २०१८ रोजी पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान या बांधकामाच्या समोर व्हरांड्यात बांधकाम आढळल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ अन्वये ५ मे २०१८ रोजी सद्यस्थितीत मालक असणाºया अभिषेक विनोद जैन यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने जैन यांनी २७ जून २०१८ रोजी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासणीअंती नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपामार्फत कळविण्यात आले आहे.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

Web Title: Action Taken promptly for encroachment on school reserved plot - Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.