जलयुक्तमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: May 25, 2017 01:49 AM2017-05-25T01:49:12+5:302017-05-25T01:49:12+5:30

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे.

Action on those who are late | जलयुक्तमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

जलयुक्तमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. नियोजनाप्रमाणे निश्चित केलेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने जारी करुन जलयुक्तची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिला.
जिल्ह्यातील जलयुक्तची निम्मी कामे कागदावरच असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारीच प्रसिद्ध केले होते. त्याची शिंदे यांनी दखल घेतली. शिंदे यांनी कामांची पाहणी करून आढावा घेतला. जिल्ह्यातील १९१ गावांमध्ये १६ हजार ७९५ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यातील कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. २०१६-१७ मधील कामांवर मी समाधानी आहे. मात्र २०१७-१८ या वर्षात करावयाची कामे संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट करीत शासन निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
परंडा तालुक्यात जलयुक्त शिवार कामाच्या माध्यमातून अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात असून, दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने पंचनामा केलेल्या वाळूचा साठा रातोरात लंपास झाला आहे. या प्रकरणीही दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिली.

Web Title: Action on those who are late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.