शिरपूर साखर कारखाना बंद पाडणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: April 11, 2016 03:18 AM2016-04-11T03:18:31+5:302016-04-11T03:18:31+5:30

शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरळीत चालविणे हे मोठे जिकरीचे काम आहे़ कारखान्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांच्या पीएफ, शेतकऱ्यांची देणी आदी अनेक समस्या आहेत़

Action on those who were shutting down the Shirpur sugar factory | शिरपूर साखर कारखाना बंद पाडणाऱ्यांवर कारवाई

शिरपूर साखर कारखाना बंद पाडणाऱ्यांवर कारवाई

Next

धुळे : शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरळीत चालविणे हे मोठे जिकरीचे काम आहे़ कारखान्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांच्या पीएफ, शेतकऱ्यांची देणी आदी अनेक समस्या आहेत़ या संदर्भात लवकरच सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल़ शिसाका बंद पाडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे सांगितले. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
आदिवासी- दलितांना घरे
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष समता वर्ष म्हणून जाहीर केले आहे़ राज्यातील बेघर आदिवासी व दीनदलितांना २०१९ पर्यंत घरे दिली जाणार आहेत, असे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले.

Web Title: Action on those who were shutting down the Shirpur sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.