अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Published: November 3, 2016 02:45 AM2016-11-03T02:45:22+5:302016-11-03T02:45:22+5:30
महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत बिल्डर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना दणका दिला.
पनवेल : महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत बिल्डर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना दणका दिला. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडचण निर्माण करणाऱ्यांना बांधकाम परवानगीच्या अटींचा भंग केल्याबद्दल त्यांच्या बांधकामाला स्थगिती दिली व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या, त्यामुळे पनवेलकर समाधानी आहेत.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आयुक्त सुधाकर शिंदे यांना पाहणी दौऱ्यात अनेक ठिकाणी काही जण बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी स.नं. ७९७ साई नगर, तुलसी बिल्डर्स, प्रॉपर्टी क्र . ८५४ याकुब बेग ट्रस्ट, प्रॉपर्टी क्र .८९९ , ९८० असिन कानाजी शाह, प्रॉपर्टी क्र . ८४९ , ८४९/१ , ८५०, ८५०/१ मे. वी.बी. रिओलिटीज, अ.भू. क्र . ४१६ /१ मे. खान एन्टरप्रायजेस यांच्या कामाला स्थगिती दिली आहे.
मनपा हद्दीत समावेश झालेल्या भागात अनधिकृत बांधकाम करीत असलेल्या अब्दुल आजिज शेख - रोडपाली, जगदीश के. पाटील - रोडपाली, मच्छिंद्र गोविंद पाटील, रोहिंजण, दशरथ म्हात्रे आसूडगाव, महादेव सोमवार भगत कळंबोली यांना नोटीस देण्यात आली आहे. आयुक्तांनी यापुढे कोणी अनधिकृत बांधकाम करताना आढळल्यास त्याला कारवाईला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)