हयगय केल्यास होणार कारवाई

By admin | Published: June 8, 2017 03:52 AM2017-06-08T03:52:51+5:302017-06-08T03:52:51+5:30

कामाचा दर्जा आणि प्रगती याविषयी हयगय केल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले

Action will be taken against the hijayas | हयगय केल्यास होणार कारवाई

हयगय केल्यास होणार कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी विविध रस्त्यांची पाहणी करून कामाचा दर्जा आणि प्रगती याविषयी हयगय केल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. दरम्यान, काही ठिकाणी काम समाधानकारक नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांविषयी त्यांनी उघड नाराजी व्यक्त करून कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
बुधवारी सकाळी ११ ते २ या कालावधीत जयस्वाल यांनी पायी फिरून मानपाडानाका ते टिकुजिनीवाडी चौक रस्त्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी फुटपाथची दुरुस्ती, फ्लॉवर बेड, कर्ब स्टोन बसवणे, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, विजेचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करणे, रस्त्यालगतच्या गटारांची साफसफाई करणे तसेच चेंबर कव्हर्स बसवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या. टिकुजिनीवाडी चौकामध्ये रस्ता रुंदीकरण झालेल्या ठिकाणी नव्याने चौक निर्माण करण्याच्या सूचना देतानाच रस्त्याला पर्यायाने वाहतुकीस अडथळा ठरणारा वृक्ष स्थलांतरित करण्याच्या सूचना देतानाच निसर्ग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे फिनिशिंग, पार्किंग आणि फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, जोडरस्त्यांच्या ठिकाणी डांबर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जयस्वाल यांनी ग्लॅडी अल्वारीस रस्त्याची पाहणी करून अर्धवट असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर गांधीनगर ते बेथनी हॉस्पिटल, उपवन तलाव येथील कल्व्हर्ट तसेच पोखरण रोड नं. २ च्या रस्त्याची पाहणी करून ठिकठिकाणी अर्धवट राहिलेल्या ठिकाणी तत्काळ डांबर टाकण्याचे आदेश दिले. दरम्यान, या वेळी त्यांनी ज्याज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्यात्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून संरक्षक कठडे उभे करण्याचे तसेच त्या ठिकाणी कामाच्या सूचनेचा नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, मोहन कलाल, नितीन पवार, डॉ. हळदेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
>वृक्ष स्थलांतरित करा
नव्याने चौक निर्माण करण्याच्या सूचना देतानाच रस्त्याला पर्यायाने वाहतुकीस अडथळा ठरणारा वृक्ष स्थलांतरित करण्याच्या सूचना देतानाच निसर्ग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे फिनिशिंग, पार्किंग आणि फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, जोडरस्त्यांच्या ठिकाणी डांबर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जयस्वाल यांनी ग्लॅडी अल्वारीस रस्त्याची पाहणी करून अर्धवट असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Action will be taken against the hijayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.