शौचालय न बांधणाऱ्यांवर होणार कारवाई
By admin | Published: September 20, 2016 07:35 PM2016-09-20T19:35:49+5:302016-09-20T19:35:49+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्या सहा लाभार्थींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २० : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्या सहा लाभार्थींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी, असे पत्र नंदुरबार पालिकेने शहर पोलीस ठाण्यात दिले आहे़
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता गृह बांधकाम करण्यात यावेत यासाठी पहिल्या टप्प्यात लाभार्र्थींना सहा हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले होते़ हे अनुदान प्राप्त झाल्यानंतरही ललिता मनोहर तमायचेकर, आशा कांतीलाल बजरंगे, शारदा अश्विन तिलंगे, शंकर हुकुमसिंग तिलंगे, अनिता बुद्धासकट, पूर्णाबाई वसंत तमायचेकर सर्व रा़ कंजरवाडा यांनी शौचालयांचे बांधकाम सुरू केले नाही़ याबाबत पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबधितांना वारंवार सूचना करूनही त्यांनी बांधकाम सुरू करण्याची कारवाई केली नाही़ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समक्ष भेटी देऊनही कारवाई न झाल्याने अखेर पालिकेने कारवाईचे पाऊस उचलले आहे़
राज्यात लाभ घेऊनही बांधकाम पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे़ यापूर्वी कोणत्याही पालिकेने असे पाऊल उचललेले नसल्याची माहिती आहे़ नंदुरबार पालिकेने दिलेल्या पत्रावर शहर पोलीस ठाण्यात केव्हा कारवाई होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही़ मात्र लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़