घोषणा देणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार
By Admin | Published: February 8, 2015 11:34 PM2015-02-08T23:34:55+5:302015-02-08T23:34:55+5:30
बेळगावातील ९५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला २१ जाचक अटी घालून परवानगी देणा-या कर्नाटक पोलिसांनी आता संमेलनातील उद्घाटन समारंभात आणि
बेळगाव : बेळगावातील ९५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला २१ जाचक अटी घालून परवानगी देणा-या कर्नाटक पोलिसांनी आता संमेलनातील उद्घाटन समारंभात आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देणाऱ्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू केला आहे.
नाट्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करू नये, कोणतेही सीमा प्रश्नावर आधारित नाटक दाखविले जाऊ नये, संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या जाऊ नयेत, आदी एकूण २१ जाचक अटी घालून नाट्य संमेलनास परवानगी दिली होती. नाट्य परिषदेनेही या अटी मान्य करून परवानगी मिळविली होती. मात्र, बेळगावातील मराठी भाषिकांनी उद्घाटन समारंभातील ग्रंथदिंडीत आणि मुख्य समारंभात तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या होत्या.