ना-वापर वाहनांवर होणार कारवाई
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:47+5:302015-12-05T09:07:47+5:30
ना-वापर घोषित केलेली वाहने विनापरवानगी रस्त्यावर धावतानाच कर चुकवेगिरीही करत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी
मुंबई : ना-वापर घोषित केलेली वाहने विनापरवानगी रस्त्यावर धावतानाच कर चुकवेगिरीही करत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी परवानाधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे.
त्यानुसार परवान्यावरील परिवहन वाहनांचा ना-वापर घोषित केल्यानंतर असे वाहन परवानाधारकास सार्वजनिक ठिकाणी वापरात आणता येणार नसल्याची अट घालण्यात आली आहे. या अटीचा भंग केल्यास ज्या कालावधीसाठी ना-वापर घोषित केले आहे, त्या कालावधीसाठी परवाना निलंबित करण्यात येईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. निलंबनाच्या कारवाईऐवजी त्या कालावधीच्या कराच्या रकमेइतकी रक्कम तडजोड शुल्क म्हणून आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत कोणतीही हरकत किंवा सूचना असल्यास लेखी स्वरूपात mh01@mahatranscom.in या मेल आयडीवर ८ जानेवारी २0१६पर्यंत पाठवाव्यात.