सोशल मीडियावरही सक्रिय

By admin | Published: August 27, 2015 01:47 AM2015-08-27T01:47:22+5:302015-08-27T01:47:22+5:30

इंद्राणी मुखर्जी यांच्या जगण्याबद्दल सोशल मीडियात डोकावले तर ही बाई अतिशय थंड डोक्याने खून करणारी असू शकते यावर विश्वास बसणार नाही. उलट तिला पार्ट्या झोडणे व तंदुरुस्त

Active on social media | सोशल मीडियावरही सक्रिय

सोशल मीडियावरही सक्रिय

Next

-  डिप्पी वांकाणी,  मुंबई
इंद्राणी मुखर्जी यांच्या जगण्याबद्दल सोशल मीडियात डोकावले तर ही बाई अतिशय थंड डोक्याने खून करणारी असू शकते यावर विश्वास बसणार नाही. उलट तिला पार्ट्या झोडणे व तंदुरुस्त राहून जगभर प्रवास करायला आवडतो, असे दिसेल. इंद्राणीचा
पती पीटरने अगदी मोजक्या वेळाच टिष्ट्वटरचा वापर केला व तो सोशल मीडियावर सक्रियदेखील नाही. परंतु इंद्राणीला सणासुदीच्या दिवसांतील, प्रवासातील व विशेषत: आपल्या मुलीसोबतची छायाचित्रे पोस्ट करायला आवडते. इंद्राणीची तिच्या मुलीसोबतची छायाचित्रे पाहून तिच्या मित्रांनी ती दिवसेंदिवस तरुण होत असून आता ती तिच्या मुलीची बहीणच वाटते, अशी प्रतिक्रिया पाठविली. यावर्षी जुलैपर्यंत इंद्राणी सोशल मीडियावर एवढी सक्रिय होती की ते पाहून तिने आपल्या मुलीच्या खुनाचा प्रत्यक्ष आदेश दिला होता, असे कोणालाही वाटणार नाही. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर शीनाच्या खुनाचा आरोप होता व तिला अटकही झाली होती. या शीनाचे लिंकएडइनवरील एकमेव अकाउंट वगळता सोशल मीडियावर अकाउंट नव्हते व लिंकएडइनवरील खाते २०११ पासून अपडेटही केलेले नव्हते.
इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये मुलगी शीनाच्या खुनाचा आदेश तिच्या ड्रायव्हरला दिल्याचा आरोप आहे. तेव्हापासून इंद्राणी केवळ जगभरच फिरत नसून, तिच्या फेसबुक प्रोफाइलवर नियमितपणे छायाचित्रेही पोस्ट करीत आहे. तिने दिवाळीत सजवलेल्या घराची छायाचित्रे जशी सोशल मीडियावर पोस्ट केली त्याच उत्साहात तिने नूतन वर्षात लुटलेल्या सुट्यांच्या आनंदाची छायाचित्रेही पोस्ट केली. ३१ डिसेंबर २०१४ रोजी इंद्राणीने तिच्या फेसबुक फ्रेंड्सला खालील शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या -
हाय आॅल, वर्षअखेर किती आनंददायी होते आणि २०१५ वर्ष किती अद््भुत आहे. सरलेले वर्ष किती धावपळीचे होते तरीही ते प्रवास, मुक्काम, कुटुंबीय व मित्रांसोबत वेळ घालविणे, आरोग्यदायी खाणे असा संमिश्र आनंद लुटता येईल असे होते. वजन कमी करणे अशक्य ठरले, तरीही हे संपूर्ण वर्ष तसे छान गेले. तुमचेही २०१४ हे वर्ष चांगले गेले असेल अशी मला आशा आहे. नवीन वर्ष सुरक्षित, आरोग्यदायी व आनंदी असेल व गेल्यावर्षी आपण जेवढे एकमेकांना भेटलो त्यापेक्षा २०१५ मध्ये जास्तवेळा भेटू, अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. आम्ही ज्या आनंदात दिवस घालविले त्याच्या घेतलेल्या छायाचित्रांचा कोलाज पीटरने केला असून, तो तुम्हाला दाखवावा हा विचार केला.


छायाचित्रे पोस्ट करण्याची सवय
इंद्राणीने शेवटचे छायाचित्र पोस्ट केले ते १६ जुलै रोजी. तिच्या या छायाचित्राला तिच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ््यांना तिने उत्तरे पाठविली. स्वत:च्या तरुण दिसण्याचे श्रेय तिने कच्चे अन्न खाण्याला दिले आहे. इंद्राणीने गोवा, स्पेन आणि इतर ठिकाणी सुट्यांचा आनंद लुटला व तेथील छायाचित्रे तिने पोस्ट केली.
मृत शीना बोरा हिच्या आॅनलाइन पाऊलखुणा आहेत त्या लिंकएडइन या व्यावसायिक नेटवर्किंग वेबसाइटवर. शीना जुलै २०११ पासून मुंबईत रिलायन्स एडीएजीत असिस्टंट मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस) म्हणून काम करीत असल्याचे तिचे प्रोफाइल सांगते. तेव्हापासून प्रोफाइलवर कोणतीही घटना घडलेली नाही. प्रोफाइलवरून असे दिसते, की २००९ ते २०११ या कालावधीत शीना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ट्रेनिंग अँड आॅर्गनायझेशन डेव्हलपमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार होती. बोराने सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. केले.

Web Title: Active on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.