आंदोलक महिलांवर लाठीमार!
By admin | Published: March 14, 2016 02:54 AM2016-03-14T02:54:02+5:302016-03-14T02:54:02+5:30
निघोज येथे दारूबंदीसाठी फेरमतदान घेण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला.
पारनेर (अहमदनगर) : निघोज येथे दारूबंदीसाठी फेरमतदान घेण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १० आंदोलक जखमी झाले.
निघोजमध्ये दारूबंदीसाठी फेरमतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. मात्र उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अजूनही न्यायालयात उपरोक्त माहितीच सादर न केल्याने संतप्त महिला रविवारी रस्त्यावर उतरल्या. सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके यांच्यासह महिला आंदोलकांची साध्या वेषातील पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. वाहनात जाण्यास महिला आंदोलकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करून लाठीमार केला. (प्रतिनिधी)पुण्याकडे जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आंदोलनामुळे रस्त्यातच अडकले. त्यांनी १ किमी अंतर पायी चालत येऊन मध्यस्थी केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडले. निघोज दारूबंदीचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.मारहाण केल्याचा इन्कार : आंदोलनामुळे ४-५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आम्ही आंदोलकांना बळजबरीने वाहनांत बसविले, आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही कोणालाही मारहाण केलेली नाही. आमच्याकडे व्हिडीओ चित्रीकरणसुद्धा आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले.