मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक
By admin | Published: May 19, 2017 02:17 PM2017-05-19T14:17:38+5:302017-05-19T14:20:18+5:30
सांगली दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 19 - सांगली दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय बेले, आभिजीत पाटील, वैभव चौगुले, महावीर पाटील अशी त्यांची नावे आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना सांगलीत काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही काही कार्यकर्त्यानी पोलिसांची नजर चुकवून आंदोलन केले.
मुख्यमंत्री सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय कार्यालय उदघाटनासाठी आले आहेत. सांगलीतील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. पतंगराव कदम, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.