अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

By admin | Published: March 8, 2015 12:01 PM2015-03-08T12:01:05+5:302015-03-08T12:01:05+5:30

दी गाणी लावली नाही म्हणून पबमध्ये तोडफोड करणे अभिनेता आदित्य पांचोलीच्या अंगलट आले असून या मारहाणीमुळे पांचोलीला थेट तुरुंगाची हवा खावी लागली.

Actor Aditya Pancholi arrested | अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ८ -  हिंदी गाणी लावली नाही म्हणून पबमध्ये तोडफोड करणे अभिनेता आदित्य पांचोलीच्या अंगलट आले असून या मारहाणीमुळे पांचोलीला थेट तुरुंगाची हवा खावी लागली. मुंबई पोलिसांनी आदित्य पांचोलीला अटक केली असून आज त्यांना मुंबईतील सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

आदित्य पांचोली हे शनिवारी रात्री  एकच्या सुमारास जुहूतील एका पबमध्ये गेले होते. मद्यधूंद अवस्थेत असलेल्या पांचोली यांनी पबमधील डिजेला हिंदी गाणी लावण्यास सांगितली. मात्र डिजेने याकडे दुर्लक्ष केल्याने पांचोली यांचा राग अनावर झाला व त्यांनी पबमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. पांचोली यांनी पबमध्ये तोडफोड करत डीजेला शिवीगाळ केली. त्यांना रोखणा-या बाऊन्सरलाही पांचोलींनी मारहाण केली. अखेरीस याप्रकरणी पब मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांताक्रूझ पोलिसांनी आदित्य पांचोलीला अटक केली आहे. 

Web Title: Actor Aditya Pancholi arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.