अकोल्याची चिमुकली अॅक्टर बनली ‘डान्स प्लस-२ शो’ची जज!
By admin | Published: September 30, 2016 11:51 AM2016-09-30T11:51:28+5:302016-09-30T12:10:35+5:30
या अकोल्यातील बालकलाकार समृद्धी कृष्णा आसरकर हिने डान्स प्लस-२ सिजनची सुपर जज म्हणून काम केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि, ३० - महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘मन में है विश्वास’ शोमध्ये मुख्य भूमिका करणा-या अकोल्यातील बालकलाकार समृद्धी कृष्णा आसरकर हिने पुन्हा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. चिमुकल्या समृद्धीला प्रसिद्ध विनोदी अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री नर्गिस फक्री, कोरिओग्राफर रेमो डिसुजा, धर्मेश, भक्ती आणि पूनीत यासारख्या सेलिब्रेटींसोबत एका चॅनलवरील डान्स प्लस-२ सिजनची सुपर जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डान्स प्लस-२ मध्ये सहभागी झालेल्या कलावंतांच्या नृत्याचे चिमुकल्या बालकलाकार समृद्धीने परीक्षण केले आणि आपला अभिप्रायसुद्धा दिला.
समृद्धी रामदासपेठ येथे राहणारे विवेक आसरकर, ज्योती आसरकर यांची नात. समृद्धीचे वडील कृष्णा आसरकर हे बांधकाम व्यवसायानिमित्त नागपूरला स्थायिक झाले आहेत. समृद्धी ही बालपणापासून दिसायला गोरीगोमटी, गोंडस, गोजिºया परीसारखी. तिच्या चेहºयावरील हावभाव, बोलक्या डोळ्यांंमुळे सहजच कुणीही तिच्याकडे आकर्षित होतो. अशातच चिमुकल्या समृद्धीला उपजतच अभिनयाची देण मिळाली. समृद्धी ही पहिल्या वर्गामध्ये शिकते. बालवयातच समृद्धीने लिटिल स्टार कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन अवॉर्ड पटकावला. इंडियन फॅशन वीकमध्येही समृद्धीचे कौतुक झाले. एवढेच नाही तर तिला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. समृद्धी ही उत्कृष्ट निवेदक आहे. तिच्या संवाद फेकीची शैली लक्षवेधक आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजा याने समृद्धीला एका चॅनलवरील डान्स प्लस-२ शोसाठी चिमुकल्या समृद्धीला सुपर जज म्हणून आमंत्रित केले होते. समृद्धीने प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची बँजो चित्रपटातील अभिनेत्री नर्गिस फक्री, कोरिओग्राफर धर्मेश, भक्ती व पूनीत यासारख्या सेलिब्रेटींसोबत शोमधील सहभागी कलावंताच्या नृत्याचे परीक्षण केले. यावेळी रितेश देशमुख, नर्गिस फक्री, रेमो डिसुजासोबत दंगामस्तीही केली. तिच्या गुणवत्ता आणि कला पाहून रितेश देशमुख, रेमोने तिचे भरभरून कौतुक केले. बालवयातच समृद्धीने प्रसिद्ध डान्स प्लस- २ शोचे परीक्षण करण्याचा मान मिळविला. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.