अभिनेते वसंतराव गोगटे यांचे निधन

By admin | Published: May 9, 2017 02:35 AM2017-05-09T02:35:28+5:302017-05-09T02:35:28+5:30

ज्येष्ठ अभिनेते वसंतराव गोगटे (७६) यांचे सोमवारी सकाळी विलेपार्ले येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे

Actor Vasantrao Gogte passed away | अभिनेते वसंतराव गोगटे यांचे निधन

अभिनेते वसंतराव गोगटे यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते वसंतराव गोगटे (७६) यांचे सोमवारी सकाळी विलेपार्ले येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना ‘ब्रह्मांडनायक’ या दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकेत गजानन महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि तिचे त्यांनी सोने केले. त्यांच्या या भूमिकेमुळे गजानन महाराजांची गाथा घराघरांत पोहोचली. वयाच्या ६५ वर्षी त्यांनी साकारलेल्या या भूमिकेची नोंद ‘लिम्का बुक्स आॅफ रेकॉर्ड’ मध्येही झाली. माहीम येथील श्री गजानन महाराज (शेगांव) सांस्कृतिक महामंडळाचे ते विश्वस्त व अध्यक्ष होते.

Web Title: Actor Vasantrao Gogte passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.