राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:02 PM2020-09-13T23:02:31+5:302020-09-13T23:07:09+5:30
कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत बीएमसीने त्यावर हातोडा चालवला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. कंगना आणि शिवसेना आमने-सामने आहेत.
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने रविवारी सायंकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर तिने ही भेट घेतली आहे. राज्यपालांना भेटल्यानंतर तिने, माध्यमांशी संवाद साधला. कंगना म्हणाली, ते (राज्यपाल) येथील आपल्या सर्वांचे गार्डियन आहेत. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझ्यासोबत वाईट व्यवहार झाला. गव्हर्नर साहेबांनी मुलीप्रमाणे माझे म्हणणे ऐकले. मला विश्वास आहे, की मला न्याय मिळेल. राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात कमळाचे फूलही दिसली.
कंगनाच्या हातात दोन कमळाची फुलं -
अलिकडच्या काळातील घटनाक्रम पाहता, कंगना रणौतचा कल भारतीय जनता पक्षाकडे असल्याचा कयार लावला जात आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर, कंगना जेव्हा बाहेर आली, तेव्हा तिच्या हातात दोन कमळाची फुलं होती. यामुळे ती कमळ हातात घेईल, या कयासाला अधिकच बळकटी मिळत आहे. कंगनाच्या आईनेही नुकतेच म्हटले होते, की त्यांचे कुटुंब पूर्वी काँग्रेस समर्थक होते. मात्र, आताची परिस्थितीपाहता आता त्यांचे कुटुंब भाजपाचे समर्थन करेल.
#WATCH I met Governor Koshyari & told him about unjust treatment I've received. I hope justice will be given to me so that the faith of all citizens including young girls, is restored in the system. I am fortunate that the Governor listened to me like a daughter: Kangana Ranaut pic.twitter.com/aZRohVVUhi
— ANI (@ANI) September 13, 2020
कंगनाचा कल भाजपाकडे असण्याचे आणखीही काही संकेत मिळतात. जसे, केंद्र सरकारने कंगनाची सुरक्षितता लक्षात घेत, तिला वाय श्रेणीचे संरक्षण दिले आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या बोलण्यावरूनही भाजपाचा कंगनाला पूर्ण पाठींबा असल्याचे दिसून येते.
"कंगना भाजपात गेली तर तिला राज्यसभेचे तिकीट मिळू शकते" -
नुकतीच केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कंगनाची भेट घेतली होती. तेव्हा महाराष्ट्र सरकारने बदल्याच्या भावनेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. यावेळी कंगना भाजपात गेली तर तिला राज्यसभेचे तिकीट मिळू शकते, असेही रामदास आठवले यांनी म्हटले होते. कंगनाने रविवारी राजभवनात जाऊन राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली, तेव्हा तिची बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती.
बीएमसीच्या कारवाईनंतर भाजपाही कंगनाच्या समर्थनात -
कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत बीएमसीने त्यावर हातोडा चालवला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. कंगना आणि शिवसेना आमने-सामने आहेत. बीएमसीच्या कारवाईनंतर भाजपाही कंगनाच्या समर्थनार्थ समोर आली आहे. तसेच बीएमसीची कारवाई एकतर्फी असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स
कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी