अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार जयंती

By Admin | Published: September 10, 2016 09:58 AM2016-09-10T09:58:27+5:302016-09-10T09:58:58+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे यांची आज (१० सप्टेंबर) जयंती

Actress Bhakti Barve-Inamdar Jayanti | अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार जयंती

अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार जयंती

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १० -  ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे यांची आज (१० सप्टेंबर) जयंती.  त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण.
 
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. फुलराणीचे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.
 
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे. 
फेब्रुवारी १२ इ.स. २००१रोजी त्यांना पुणे-मुंबई गतिमार्गावर अपघाती मृत्यू आला.
 
भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके
अखेरचा सवाल
अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य)
अजब न्याय वर्तुळाचा
आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे)
आधे अधुरे(हिंदी आणि मराठी)
आले देवाजीच्या मना
कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य)
गांधी आणि आंबेडकर
घरकुल
चिनी बदाम (बालनाट्य)
जादूची वेल (बालनाट्य)
टिळक आणि आगरकर
ती फुलराणी
दंबद्वीपचा मुकाबला
पपा सांगा कुणाचे
पळा पळा कोण पुढे पळे तो पुरुष
पुलं, फुलराणी आणि मी
बाई खुळाबाई
बूटपोलिश
माणसाला डंख मातीचा
मिठीतून मुठीत
रंग माझा वेगळा
रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती)
वयं मोठं खोटम् (बालनाट्य)
शॉर्टकट
सखी प्रिय सखी
हँड्स अप
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Actress Bhakti Barve-Inamdar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.