संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:40 PM2023-08-05T12:40:40+5:302023-08-05T12:42:38+5:30

अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली.

Adarsh Scam in Sambhajinagar; 210 crores misappropriation in credit institution | संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार

संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार

googlenewsNext

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २१० कोटींचा घोटाळा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उघड केला. अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली.

महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक-२०२३ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सादर केले. या विधेयकावर दानवे यांनी सहकार संस्थेचे विधेयक आणताना त्यात काही सूचना करत हे विधेयक कडक करण्याची मागणी केली.  यावेळी त्यांनी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. या  पतसंस्थेने कर्जदारांना कर्ज वाटप केले. ज्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे २१० कोटी रुपये पतसंस्थेत अडकून राहिले. या बँकेने अशा पद्धतीने आधुनिक सावकारीच सुरू केली होती, असा आरोप त्यांनी केला.  

व्यवस्थापकाची स्वाक्षरी न घेता कर्जवाटप
आदर्श नागरी पतसंस्थेने ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता, साक्षीदारांचा कुठला पुरावा न घेता तसेच अनेक ठिकाणी बँकेच्या मॅनेजरची स्वाक्षरीसुद्धा नसताना कर्ज वाटप केले. परिणामी ही बँक बुडीत निघाली. ज्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले आहेत. यावर आता सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Adarsh Scam in Sambhajinagar; 210 crores misappropriation in credit institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.