व्यसनी शिक्षक सुधारले नाहीत तर बडतर्फीची कारवाई - विनोद तावडे
By Admin | Published: January 8, 2016 01:21 PM2016-01-08T13:21:51+5:302016-01-08T13:22:47+5:30
दारू, तंबाखू व विडीसारख्या व्यसनांना जवळ करणा-या शिक्षकांचे अनुकरण विद्यार्थी करू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थीही व्यसनी बनू शकतात
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - व्यसनी शिक्षकांच्यावर बडतर्फीसारखी कारवाई होऊ शकते असा कडक इशारा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. दारू, तंबाखू व विडीसारख्या व्यसनांना जवळ करणा-या शिक्षकांचे अनुकरण विद्यार्थी करू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थीही व्यसनी बनू शकतात, त्यामुळे शिक्षकांनीच आदर्श वागणूक आचरणात आणावी असा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्रालय करत आहे.
व्यसनी शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार नसल्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. तसेच, एकदा इशारा देऊनही सुधारणा न झाल्यास बडतर्फीचा बडगा उगारला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे.