कोरोनाग्रस्तांच्या दैनिक आकड्यात भर, राज्यात दिवसभरात आढळले २,१९० पॉझिटीव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:34 PM2020-05-27T21:34:56+5:302020-05-27T21:35:19+5:30
राज्य सरकारकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरा २१९० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ९४८ एवढी झाली आहे. राज्यात आज २१९० नविन रुग्ण आढळून आले आहेत. तर, ९६४ कोरोनाबाधित रुग्णांना सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७९१८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. सध्या राज्यात ३७,१२५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या आकडेवारीबद्दल माहिती देताना, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येवर भर दिला. तसेच, केंद्र सरकारच्या पथकाने दिलेल्या अंदाजानुसार, आपण परिस्थिती मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणल्याचेही ठाकरेंनी सांगितले. तसेच, क्वारंटाईन सेंटर आणि कोविड रुग्णालयाच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त रुग्णांची सोय करण्याचं नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात आज 2190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 56948 अशी झाली आहे. आज नवीन 964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 17918 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 27, 2020
राज्य सरकारकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरा २१९० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५७ हजारांजवळ पोहोचली आहे. मात्र, सध्या रुग्णालयात दाखल असलेले, उपचार घेणारे एक्टीव्ह रुग्ण हे ३७,१२५ एवढेच आहेत.